सावनेर : तहसील कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व जिल्हा कार्यपालन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत शासकीय स्तरावर सुरू असलेल्या कोवीड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर तपशीलवार आढावा घेण्यात आला. शहर व तालुक्यातील प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करून शासनास सहकार्य करावे असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी केले. सध्या परिस्थितीत सावनेर तालुकासह उपविभागीय स्तरांवर सुरू असलेल्या कोवीड-19चे कार्य व कोरोना विषाणूंची लागन झालेल्या रुग्णाची नियंत्रणात असलेल्या संख्येवर समाधान व्यक्त केले, हे विशेष. (व्हिडिओ : विजय पांडे) <br /><br /><br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.